

तुळजापूर : दिनांक २९ (प्रतिनिधी सुरज थोरात)
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी निवड बैठक दि. 28 डिसेंबर 2025 रोजी शासकीय विश्रामगृह, शिवाजी महाराज चौक, तुळजापूर येथे पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थितांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत बौद्ध धम्माचा प्रसार, प्रचार व समाजप्रबोधनासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला. “विशाल धम्म राज्य घडविणे हेच खरे बौद्धांचे कर्तव्य आहे,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या निवड बैठकीत तुळजापूर तालुका कार्यकारिणीला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची अधिकृत शाखा मान्यता प्रमाणपत्र देण्यात आले. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष:ज्ञानेश्वर बनसोडे, कार्याध्यक्ष:विठ्ठल जेटीथोर, उपाध्यक्ष:मारुती रोकडे, सचिव:लक्ष्मण वडवराव, सरचिटणीस:विठ्ठल सुरते, उपाध्यक्ष:अण्णासाहेब बनसोडे, महिला अध्यक्ष:पार्वती केशव मस्के, उपाध्यक्ष:कांचन मोतीराम चिमणे, सचिव:जोत्सना लक्ष्मण बागडे, प्रियांका बीबीषण कांबळे, किरण भालशंकर, संकेत दिलपाक, नितीन साखरे, प्रवीण चंदनशिवे, शशिकांत बनसोडे, विलास दुपारगुडे, प्रवीण मुकरे, संतोष माने या सर्वांची निवड करण्यात आली असून, सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस तालुक्यातील बौद्ध उपासक-उपासिका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



