
गणेशोत्सव आणि आगामी सणानिमित्त शांतता राखण्याचे नागरिकांना आवाहन

कामती , दि १४ सप्टेंबर ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) कामती पोलीस स्टेशनकडून कामती पोलीस स्टेशन हद्दीतील कामती,बेगमपूर व कुरुल येथे पोलिस व होमगार्ड यांचा रूट मार्च काढण्यात आला , गणेशोत्सव व आगामी सण उत्सव या सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि समाजकंटकावर पोलिसांचा वचक राहावा, या उद्देशाने कामती पोलीस स्टेशनच्या वतीने बेगमपूर,कुरुल, कामती येथे पोलीस अंमलदार व होमगार्ड यांच्या सहभागाने रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च दरम्यान गावातील प्रमुख रस्ते,बाजारपेठ या ठिकाणावरून पोलिसांनी संचालन केले यावेळी नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच अफवा गैरसमज किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये आणि असे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे आवाहन करण्यात आले.
सण उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी नागरिक व पोलीस यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.
कामती पोलीस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी कामती पोलीस स्टेशन सदैव तत्पर आहे. असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर.जकिकोरे यांनी केले आहे.



