Nation
Trending

एल.पी.जी सिलिंडर बुकिंगचा कालावधी ४५ वरून २५ दिवसांवर

ग्राहकांना मोठा दिलासा ! २५ दिवसांनंतर करता येणार पुढील बुकिंग.

सोलापूर : प्रतिनिधी – राहुल उडाणशिव

एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या पुढील बुकिंगसाठी असलेला ४५ दिवसांचा कालावधी आता २५ दिवसांपर्यंत करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील सिलिंडर घेतल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना पुढील सिलिंडरचे बुकिंग करता येणार आहे.
यापूर्वी ग्राहकांना पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, नवीन कालावधी लागू झाल्याने नियमित एलपीजी वापरणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

ग्राहकांनी आपल्या मागील सिलिंडरच्या डिलिव्हरीची तारीख लक्षात घेऊन २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बुकिंग करता येते, याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button