Nation

कंदलगावात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात !

सामाजिक एकोपा जपण्याचा दिला संदेश.

कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर | प्रतिनिधी – राहुल उडाणशिव.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यात आला.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने  हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या सत्य, दया, करुणा, शांतता आणि बंधुभावाच्या शिकवणीचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या शिकवणीनुसार गरीब, गरजू आणि भुकेल्या व्यक्तींना मदत करणे, दानधर्म करणे तसेच समाजात प्रेम व आपुलकी वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात प्रेम, शांतता, परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी हजरत महम्मद शाहिद रजा कादरी व हजरत अल्लामा मैलाना तौसीफ रजा कादरी सोलापूर यांचे व्याख्यान संपन्न झाले. कंदलगावची सर्वधर्मीय एकोपा व सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवत प्रत्येक समाजघटकाने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास अध्यक्ष शरीफ शेख, अप्पालाल अत्तार, जावीद शेख इफ्तेखार पटेल, दाऊद तांबोळी, बबलू शेख, अल्ताफ शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button