Nation

गौतम नगर येथील बुद्ध विहारात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न  

आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी व्ही फडतरे विचार मंच आणि नवसमता युवक क्रीडा मंडळाचा सामाजिक स्तुत्य उपक्रम

सोलापूर , दि ३० जुलै , (द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क) दि. २९/०७/२०२६ रोजी, गौतम नगर, बुद्ध विहार, विजापूर नाका, सोलापूर येथे “मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंच, सोलापूर यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन नागीन  साबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी शिबिर घेण्यासाठी आलेल्या डॉ. मानसी हिरेमठ आणि त्यांच्या टीमचे सामाजिक कार्यकर्ते सचिन कोलते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या शिबिरात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा प्रतिसाद दिला. या  मोफत आरोग्य तपासणीमध्ये , रक्तदाब, मधुमेह व इतर तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले. या शिबिराचा  १०० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला असे मंचचे अध्यक्ष कपिल शंके यांनी माहिती दिली  

समाजहितासाठी राबविलेल्या या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लोकांना फायदा झाल्याचे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सदस्या सुजाता फडतरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंचचे अध्यक्ष कपिल शंके यांनी मानले

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संस्थेचे सचिव इंद्रजित कांबळे, सदस्य सुजाता फडतरे, सुधाकर कसबे, धीरज पुकाळे, विरेश रामपुरे, सत्यभामा फडतरे, मीनाक्षी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सचिन कोलते, नवसमता युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शिलरत्न सुरवसे आदि मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button