Nation

मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

मंगळवेढा, दिनांक 23 जुलै, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) : श्री संत दामाजी कॉलेज,न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज व बसस्थानक परिसरात मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओ व 8 मोटर सायकल स्वारावर पोलीसांनी कारवाई केल्याची माहिती निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे यांनी प्रसार माध्यमांना दिली. दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी कॉलेज मुलींची मोकाट मुले छेडछाड करीत असल्याची लेखी तक्रार पोलीस प्रशासनाकडे केली होती.

मंगळवेढा शहरातील श्री संत दामाजी महाविद्यालय,न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज व बसस्थानक परिसरात कॉलेज मधील मुली कॉलेज सुटल्यानंतर जाताना शहरातील रोड रोमिओ छेडछाड करीत असल्यांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे,पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण,वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण जाधव आदीच्या पथकाने या परिसरात विनाकारण मोकाट फिरणार्‍या रोड रोमिओला चाणक्षपणे ओळखून ताब्यात घेतले. काही मोटर सायकलस्वार कॉलेज परिसरात विनाकारण चकरा मारत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. यामध्ये 13 रोड रोमिओंना ताब्यात घेवून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम कलम 110,117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तर 8 मोटर सायकलस्वारांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला. निर्भया पथकाने या रोड रोमिओकडे कॉले परिसरात आल्यानंतर त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली, त्यावेळी ते ओळखपत्र दाखवू शकले नाहीत. या कारवाईनंतर निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे यांनी संंबंधीत कॉलेज प्राचार्य यांच्याशी चर्चा करुन कॉलेजच्या आवारात मोकाट फिरणारे आढळल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. कॉलेजमधील मुलींना डॉ.आरती कणिरे यांनी मुले छेडछाड करीत असल्यास आपली तक्रार कॉलेजमधील तक्रार पेटीत टाकावी असे सांगून मुलींनी कोणताही अन्याय सहन करु नये असे यावेळी सांगण्यात आले. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करुन त्यावर कॉलेज ओळखपत्र लावावे जेणेकरुन बाहेरची मुले कॉलेजमध्ये आल्यास तात्काळ ओळखता येतील असे त्यांनी मार्गदर्शनात सांगीतले. तसेच मुला मुलींची पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र करावी अशा ही सुचना कॉलेज प्रशासनास दिल्या.

फोटो ओळी
कॉलेज मध्ये मुलींना मार्गदर्शन करताना निर्भय पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे छायाचित्रात दिसत आहेत. (छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button