जनसेवक रामभाऊ दुधाळ यांच्यावतीने कामती येथील वारकरी शिक्षण संस्थेस ‘आरओ प्लांट’ भेट!


कामती , दि २१ जून, ( द लोकतंत्र न्यूज नेटवर्क ) श्री संत तुकाराम महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्था कामती यांना सोलापूर महानगरपालिका कॉन्टॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ व उद्योगपती मुटकुळे यांच्यावतीने ताशी 60

लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारा आरो प्लांट भेट देण्यात आला असून वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे . या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्याबद्दल संस्थेच्या वतीने रामभाऊ दुधाळ यांचा शाल आणि पारंपरिक फेटा बांधून अत्यंत आनंदी वातावरणात जाहीर सत्कार करण्यात आला.

रामभाऊ दुधाळ आणि प्रसिद्ध उद्योगपती मुटकुळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत ही मदत केली आहे. रामभाऊ दुधाळ हे समाजात नेहमीच अशा परोपकारी कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या या दातृत्वामुळे आता संस्थेतील वारकरी विद्यार्थ्यांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
याप्रसंगी रामभाऊ दुधाळ, अजित दुधाळ, आनंद खरात, प्रभाकर वाघचौरे महाराज आणि परिसरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत संकटसमयी धावून आल्याबद्दल प्रभाकर वाघचौरे महाराज आणि उपस्थित सर्व पालकांनी रामभाऊ दुधाळ व मुटकुळे मालक यांचे विशेष आभार मानले.



