Nation

दहावी निकाल अपडेट – ‘इंडियन पब्लिक स्कूलचा १००%’ निकाल !

 दक्षिण सोलापूर तालुक्याची शैक्षणिक क्षेत्रात मुसंडी ;

कंदलगाव – दक्षिण सोलापूर , दि ८. ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध शाळांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कंदलगाव येथील इंडियन पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, तालुक्यातील इतर शाळांनीही ९० टक्क्यांहून अधिक निकाल लावत बाजी मारली आहे. वडापूर येथील जुळ्या बहिणींना मिळालेले समान गुण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

प्रमुख शाळांचा निकाल आणि गुणवंत विद्यार्थी.

१. इंडियन पब्लिक स्कूल, कंदलगाव (निकाल: १००%)

​प्रथम: अंकिता चौगुले व निलेश गुडीलू (९३.८०%)

​द्वितीय: समृद्धी मल्लाव (९३.६०%)

​तृतीय: अन्वेष सुरवसे (९२.२०%)

२. जीवन विकास प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला , भंडारकवठे (निकाल: ९१.८०%)

या शाळेतील सेमी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे.

​सेमी माध्यम –  वेदांती वारे (९१%), विवेक गोंडाळे (९०.६०%), साक्षता तेली (८९.६०%).

​मराठी माध्यम: साक्षी राजपूत (८०%), तुषार बिराजदार (६९.८०%).

३. महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, मंद्रूप (निकाल: ९२.४२%)

प्रथम: श्रुतिका म्हेत्रे (९३%)

​द्वितीय: आयुष्या मोमीन (९०.८०%)

​तृतीय: सानिका कोरे व अमरीन शेख (दोघींना ९०.४०%).

४. पंचाक्षरी विद्यामंदिर, माळकवठे (निकाल: ८७.५८%)

​प्रथम: लक्ष्मी गुरुनाथ कुंभार (९५.६०%)

​द्वितीय: सुपरनिका धर्मराज बोराळे (९५%)

​तृतीय: प्रीती बसन्ना लोणी (९०.६०%).

५. लोकसेवा विद्यामंदिर, मंद्रूप (निकाल: ८९.०९%)

​येथेही सेमी माध्यम १००% उत्तीर्ण झाले आहे.

​सेमी माध्यम प्रथम: अभिषेक मोगलई (९२.२०%).

​मराठी माध्यम प्रथम: उदयराज गिरगाव (७६%).

६. श्री सेवालाल माध्यमिक आश्रम शाळा, शंकरनगर (निकाल: ९२.३०%)

​प्रथम: गंगाराम सिद्धलिंग कुंभार (९०%)

​द्वितीय: श्रेया जगदेव कांबळे (७५.६०%)

​तृतीय: काशिनाथ आप्पासाहेब कुंभार (७३%).

जुळ्या बहिणींचे समान यश:.

 वडापूर येथील लोकनेते प्रशालेचा निकाल ८८.८८% लागला. येथे दोन जुळ्या बहिणींना ७५% समान गुण मिळाले असून ही तालुक्यात कुतूहलाची बाब ठरली आहे. शाळेत देवयानी दिनेश कदम (८७.६०%) प्रथम आली.

श्री संगमेश्वर प्रशाला, हत्तरसंग: या शाळेचा निकाल ८८% लागला असून सानिका गंगाधर सूर्यवंशी (८५.४०%) हिने प्रथम क्रमांक मिळवला.

​सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विविध संस्थांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत असून पुढील शिक्षणासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button