सेनेच्या सोशल मीडिया बळकटीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात


सोलापूर, दि. ०४ जुलै ( वृत्तसंकलन विशाल पाटमास )
शिवसेनेची सोशल मीडिया यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख महादेव सलवदे यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून केली.
या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी मनीष अण्णा काळजे यांच्यासोबत संघटनात्मक विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. सोशल मीडिया माध्यमातून पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे, डिजिटल संघटना अधिक बळकट करणे, कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे तसेच आगामी कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.
महादेव सलवदे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सोशल मीडिया पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून पक्षाची विचारधारा आणि जनहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया संघटना अधिक सक्षम करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




