BOI STAR RSETI सोलापूर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा


सोलापूर, दि. २१ जून, ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क )
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूर येथील Boi star rseti यांच्यावतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर श्री. मानस झा, सोलापूर जिल्ह्याचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री. विश्वास वेताळ आणि RSETI चे संचालक श्री. दीपक वाडेवाले यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान, श्री. मानस झा यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले आणि नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य व निरोगी जीवनशैली कशा प्रकारे साध्य करता येते याबाबत मार्गदर्शन केले . शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींनीही या योग दिन सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदवला.
बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आणि योगगुरू श्री. शांतप्पा सलगरे यांनी उपस्थितांना विविध योगासने आणि श्वसनाच्या व्यायामांचे मार्गदर्शन केले. सदरचे शिबिर हे अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात पार पडले या कार्यक्रमातून सर्वांना योग हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.



