Nation

दखनी मुसलमान संस्कृती आणि भारतीयत्व चर्चासत्राचे आयोजन   

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने सरफराज अहमद यांचे ऑनलाईन चर्चासत्र

 

सोलापूर दि.११ जून ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क )  दखनी मुसलमान संस्कृती आणि भारतीयत्व चर्चासत्राचे    

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे . मुख्य वक्ते म्हणून सरफराज अहमद यांचे ऑनलाईन चर्चासत्र होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. हे ऑनलाइन सत्र वार शनिवार , दि . १३ जून २०२६ रोजी संध्याकाळी ७:१५ ते ८:३० च्या दरम्यान होणार असून ऑनलाइन गूगल मिटची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

वक्ता परिचय

 सरफराज अहमद हे इतिहास आणि संस्कृतीचे संशोधक आणि भाष्यकार आहेत. समकालीन महाराष्ट्रातील महत्त्वाचे इतिहास संशोधक म्हणून सरफराज यांची ख्याती आहे. पुरोगामी चळवळीतील व्याख्याते आणि कार्यकर्ते म्हणून सर्फराज परिचित आहेत. विविध राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

दुसरा शनिवार, १३ जून २०२६

संध्याकाळी 7:15 ते 8:30 पर्यंत.

(Time झोन : कोलकाता)

गुगल मीट  लिंक :     https://meet.google.com/vue-eixs-izq

विशेष विनंती –

 विषय महत्वाचा असल्याने आपण व आपल्या परिवाराने न विसरता सहभागी व्हावे, ही मनःपूर्वक विनंती.

आपला स्नेहांकित, – लक्ष्मीदास सोनकवडे, अध्यक्ष, सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान, सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button