कॅसीनो ऑर्केस्ट्राबार पुन्हा पोलिसांच्या रडारवर ; सोलापूर ग्रामीण उप विभागीय पोलिसांची धडक कारवाई;

सोलापूर ग्रामीण उप विभागीय पोलिसांची धडक कारवाई!.

सोलापूर ग्रामीण , दि. २८ ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क ) कॅसीनो ऑर्केस्ट्राबार पुन्हा पोलिसांच्या रडारवर ; सोलापूर ग्रामीण उप विभागीय पोलिसांची धडक कारवाई ; एकूण ५४ आरोपींना ताब्यात घेऊन रु. ११,९०,५९५/- किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त
पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी,सोलापूर ग्रामीण,मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रितम यावलकर वमा. उप विभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर उप विभाग सोलापूर ग्रामीण श्री. संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सोलापूर ग्रामीण उपविभागात विविध ठिकाणी दि १७/०३/२०२६ ते दि २५/०३/२०२६ रोजी पर्यंत जुगार व मटका अड्ड्यांवर धडक कारवाया करण्यात आल्या. सदर पोलीस पथकाचे कारवायांमध्ये मौजे बक्षीहिष्परगा ता.द.सोलापूर, मौजे लांबोटी ता.मोहोळ, मौजे कोंडी ता उत्तर सोलापूर, मौजे बीबीदारफळ ता. उत्तर सोलापूर तसेच मोहोळ शहर हद्दीत जुगारव मटका,कैसीनो ऑर्केस्ट्रा बारवर तसेच देशी विदेशी व हातभट्टी दारूव्यवसायावर अड्ड्यांवर छापे टाकून धडक कारवाया करण्यात आल्या. अशा प्रकारे सोलापूर ग्रामीण उप विभागातील पोलीस ठाणे हद्दीत एकुण ११ कारवायांदरम्यान ५४ आरोपी जुगार / मटका खेळताना तसेच देशी विदेशी व हातभट्टी दारू बाळगलेल्या स्थितीत तसेच कॅसीनो ऑर्केस्ट्रा बारवरील कारवाई दरम्यान आढळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याताब्यातुन रोख रक्कम,मोटार सायकली, विविध कंपनीचे मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य व देशी विदेशी व हातभट्टी दारू जप्त करण्यात आले. १. रोख रक्कम २.मोटार सायकली ३. विविध कंपन्यांचे मोबाईल फोन ४. जुगार साहित्य ५. देशी विदेशी व हातभट्टी दारू जप्त मुद्देमाल तपशील एकूण जप्त मुद्देमाल: रू. ११,९०,५९५/- गुन्हा नोंद सदर सर्व गुन्हयातील सर्व आरोपीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. कारवाईतील अधिकारी व अंमलदार : मसपोनि अंजना फाळके, मपोहेको ४४३ नागरे, मोहोळ पोलीस ठाणे पोहेका/७५८ शरद ढावरे, पोहेकों / १८२६ अशपाक शेख, पोना /५६१ गौरीशंकर बिराजदार,पोको १३१३ अनंत शिंदे, पोका/ २१२१ रवि कुंभार, पोका / ९६३ माधव लाखाडे,पोकों / २१०८ भिमराव खंडागळे,पोका / २२६७ अतुल शिंदे, पोकों/ १२८५ आप्पासो घंटे, पोक /८०८ विशाल सावंत, पोकों ८९६ किरण तोडकर,पोको २१४७ किरण चव्हाण, चापोकों / ३२ अरबाज शेख, मपोका/ १३२४ दिपाली खोत.. सदर कारवाई मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली असून, पुढील तपास संबधित पोलीस ठाणे करीत आहे.



