प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, मोहोळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहोळ दि.५, [ प्रतिनिधी सचिन गवळी ] : मोहोळ येथील प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण १०० नागरिकांनी सहभाग नोंदवला असून सर्व १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.* या उपक्रमात विशेष प्रवर्गांतील नागरिकांचाही समावेश होता. त्यामध्ये २० महिलांनी व ३० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी सोबतच मूत्ररोग विषयक विशेष तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. अक्षय पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक रुग्णांना योग्य उपचार पद्धती व पुढील काळजी बाबत सविस्तर माहिती मिळाली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वितरणही करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण भोसले, संतोष शेंडे, अतुल लवटे, जहांगिर मुजावर, महेश सोहनी, निहाल बागवान, आदित्य नागापुरे, सचिन शास्त्री यांच्यासह इतर मान्यवरांचे मोलाचे योगदान लाभले. शिबिराच्या शेवटी नागरिकांना नियमित उपचार घेण्याचे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे वेळेवर घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.




