Nation
Trending

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलिसांनी अवैध दारू वाहतूक उधळली ; मुद्देमालासह एका इसमाला घेतले ताब्यात

मुद्देमालासह एका इसमाला घेतले ताब्यात

मंद्रूप दिनांक ६ (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) प्रचाराचा तोफा थंडावल्या असून उद्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मंद्रूप पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी – कर्मचारी सज्ज झाले आहे,नागरिकांना शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी हद्दीतील अनेक गावातून रूट मार्च काढण्यात आला . निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याच्या पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,,पोलीस उपनिरीक्षक राज डांगे,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल आशपाक यांनी प्रभावी कारवाई करत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहात पकडले. सदर कारवाईदरम्यान अंदाजे ₹1,34,140/- किमतीची दारू व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली असून एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.मंद्रूप पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान मोटार सायकलवरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ कारवाई करून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला व आरोपीस ताब्यात घेतले.सदर प्रकरणी दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे.पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण हे करीत आहेत ” सदर ची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण व मा. अपर पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मां.उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पवार सहा. पोलीस निरीक्षक. पो उप निरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक रवींद्र चव्हाण, अंमलदार अश्फाक मियावाले यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button