

सोलापूर दि २४ प्रतिनिधी
रेल्वे, प्रवाशांच्या सोयीसाठी आठवड्याच्या शेवटी कलबुरगी आणि बेंगलूरू छावनी दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे,
तपशील खालीलप्रमाणे:
कलबुरगी – बेंगलूरू छावनी विशेष (१२ फेऱ्या)
– ट्रेन क्रमांक ०६२०८ कलबुरगि – बेंगलूरू छावनी विशेष २३.११.२०२५ ते २८.१२.२०२५ पर्यंत दर रविवारी कलबुरगी येथून सकाळी ०९:३५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ०८:३० वाजता बेंगलूरू छावनी येथे पोहोचेल. (६ फेऱ्या)
– ट्रेन क्रमांक ०६२०७ बेंगलूरू छावनी – कलबुरगी स्पेशल २२.११.२०२५ ते २७.१२.२०२५ पर्यंत दर शनिवारी बेंगलूरू छावनी हून रात्री ०७:२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:३० वाजता कलबुरगी येथे पोहोचेल. (६ फेऱ्या)
थांबे -: येलहंका, हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर, गुंतकल, अदोनी, मंत्रालयम रोड, रायचूर, कृष्णा, यादगीर आणि शहाबाद.
रचना: २० स्लीपर क्लास कोच आणि २ द्वितीय श्रेणीचे सामान-सह-दिव्यांगजन कोच. (२२ कोच)
आरक्षण आणि बुकिंग:
विशेष शुल्कावरील विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in वेबसाइटवर खुले आहे.
अनारक्षित कोचचे बुकिंग स्थानकांवर बुकिंग काउंटर आणि UTS अॅपद्वारे देखील करता येते. प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याची विनंती करण्यात येत आहे.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा RailOne किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
——-
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५
पीआर क्रमांक SUR/२०२५/११/१६
हे प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.



