Nation
Trending

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त विजयकुमार लोंढे नावाने 500 रुपयाचे पोस्ट तिकीट केले जाहीर

सोलापूर दिनांक 21 जानेवारी ( प्रतिनिधी रमेश जाधव )

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त विजयकुमार लोंढे नावाने 500 रुपयाचे पोस्ट तिकीट केले जाहीर करण्यात आले आहे. सोलापूर येथील रहिवासी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव आणियशवंतराव चव्हाण मुक्त व विद्यापीठ मान्यताप्राप्त विशाखा महिला लोकसंचालित साधन केंद्र सोलापूर द्वारा अभ्यास केंद्र क्रमांक – ६५१३५ सोलापूर संचलित भाई छन्नुसिंह चंदेल समाजकार्य महाविद्यालयात वृत्तपत्रविद्या वजनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम करिता मार्गदर्शक तथा प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार लोंढे यांच्या नावाने 500 रुपयाचे पोस्ट तिकीट प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सेवा संघाचे राज्य सल्लागार तथा नोबेल पुरस्कार प्राप्त विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे यांनी जाहीर केले आहे. डिजिटल मीडिया कोर्स – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरविजयकुमार लोंढे यांनी *भूषवलेली विविध पदे* सोलापूर व धाराशिव जिल्हा प्रतिनिधी- साप्ताहिक बहुजन आवाज वृत्तपत्र संपादक – बहुजन आवाज न्यूज चॅनल व पोर्टल शहराध्यक्ष – शासनमान्य ग्राहक मंच सोलापूर पत्रकार सेवा संघ इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया महाराष्ट्र उपाध्यक्ष.जिल्हा मीडिया प्रमुख – मानवाधिकार संघटना, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- राष्ट्र सेवादल व छात्रभारती, धाराशिवजिल्हाध्यक्ष – भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती, सोलापूर. पालक समिती अध्यक्ष आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य- सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर या पदावर ते कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्येक्रांतीसुर्य महात्माजोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार- महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ, सोलापूरजिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार पुरस्कार – नालंदा बुद्धविहार, सोलापूरउपक्रमशील कलाअध्यापक शिक्षक पुरस्कार – सोलापूर जिल्हा कला अध्यापन संघआदर्श पत्रकारिता पुरस्कार – इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लॉयन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी .*शैक्षणिक कार्य* प्रशालेच्या माध्यमातून मूकबधिर विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबरच त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, शासनाच्या विविध सवलती मिळवून देले. दहावीनंतर सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध शासकीय योजनांची माहिती मिळवून दिली. सदर विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, शाळेत ने आण अशा स्वरूपाचे कार्य केले आहे. विशेषतः दिव्यांग मुलींना मार्गदर्शन करून शाळेच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कला या क्षेत्रात आवड आहे अशा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. *पत्रकारिता क्षेत्र* पत्रकारिता क्षेत्रामधून आजतागायत समाजातील अन्यायग्रस्त, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले.’ ज्योती सावित्रीची लेक ‘ या मालिकेमधून अनेक कष्टाळू स्त्रियांची मुलाखत घेऊन त्यांचे कार्य उजेडात आणण्याचे प्रयत्न केले. ‘ बाबासाहेबांचे ऋणानुबंध ‘ या मुलाखत मालिकेमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या भीमसैनिकांना सहवास लाभला आहे. अशा दुर्मिळ व्यक्तींचा अनुभव या मालिकेतून देण्यात आला.बहुजन आवाज न्यूज चॅनलच्या माध्यमातून मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेतून बातम्या प्रकाशित करत आहेत. त्यासाठी अनेक नवोदित निवेदक यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या सुप्त गुणांना मंच उपलब्ध करून रोजी रोटी चा प्रश्न पूर्ण केला आहे. पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग पश्चिम महाराष्ट्र या संघाच्या महासचिव पदावरून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नवोदित पत्रकारांना एकत्र करून पत्रकार सेवा संघ वाढवण्यास विशेष परिश्रम घेतले. या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध शासकीय सवलती मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.नवोदित पत्रकारांना विविध डिजिटल पत्रकारितेचे मार्गदर्शन करून उत्तम प्रकारचे पत्रकार तयार करण्याचे काम उत्कृष्टपणे करीत अनेक निर्भीड नूतन पत्रकार समाजामध्ये तयार होत आहेत.पत्रकार संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करून आजतागायत 21 वेळा स्वतः रक्तदान करून अनेक पत्रकारांना रक्तदानाविषयी प्रेरणा दिली आहे. मी कधीच कार्यालयात बसून पत्रकारिता केली नाही. ज्या ठिकाणी कार्यक्रम, संप किंवा इतर उपक्रम सुरू असेल तेथे स्वतः जाऊन चित्रीकरण करणे, त्यांचे वृत्तांकन तयार करून ते प्रसिद्ध करणे असा माझा दिनक्रम आहे. समाजातील तसेच विविध घटक, संघटनेतील लहानातला लहान कार्यकर्ता असो अथवा समाजघटक असो, त्यांचे चांगले कार्य समाजापुढे आणण्यासाठी मी माझ्या बहुजन आवाज न्यूज चॅनेल चा वापर करण्यास मागेपुढे कधीच पाहिले नाही.कोरोना कालावधीत संचारबंदी तसेच भीतीचे वातावरण असतानाही पत्रकार असल्याने समाजातील अनेक खऱ्या बातम्या लोकापर्यंत पोहोचवले. दवाखान्यामध्ये अनेक लोकांना दाखल करून त्यांचा जीव वाचवण्यात यशस्वी झाले आहे.सोलापुरातील डी मार्ट मध्ये छापील किमतींपेक्षा जास्त किमतीचे बिल स्वीकारल्याने त्या विरोधात संबंधित कर्मचारी व व्यवस्थापक यांच्या विरोधात आवाज उठवला. परंतु मस्तवाल मालकशाहीने ऐकले नाही. या विरोधात त्यांनी ग्राहक मंचाकडे पुराव्यासह लेखी तक्रार दिली. ग्राहक मंचाने सबळ पुराव्याची चौकशी करून डी मार्ट ला दहा हजार रुपयांचा दंड केलेला आहे. हे विजयकुमार लोंढे यांच्या जिद्द, धाडसाच प्रतीक आहे.*सामाजिक कार्य*किल्लारी येथील भूकंप झाल्यानंतर अनाथ मुलांचा सर्वेक्षण करून त्यांना आधार देऊन शैक्षणिक साहित्य वाटप केले. या त्यांच्या यशाबद्दल पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक रामनाथ जऱ्हाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी तसेच पत्रकारांनी विजयकुमार लोंढे यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button