सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सविता मोहन गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

सोलापूर दि १२ ( प्रतिनिधी महेश गायकवाड )
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर सुनील नगर सोलापूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. सविता मोहन गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ विजापूर रोडवरील समृद्धी गार्डन येथे शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी भारताच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .याप्रसंगी सौ. सविता गायकवाड यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. त्यांनी सेवेत असताना आदर्श शिक्षक,आदर्श मुख्याध्यापक,जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सविता गायकवाड मॅडम यांनी आपले सेवेत फक्त मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देऊन गुणवंत विद्यार्थी निर्माण करण्यासाठी आपली सेवा खर्च केली , रावसाहेब भालेराव सेवानिवृत्त विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनीही आपल्या मनोगतात सविता गायकवाड यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला, लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे यांनीही सविता गायकवाड यांना आपल्या मनोगत पर भाषणात शुभेच्छा दिल्या , गायकवाड मॅडमच्या कन्या शिक्षिका मोहिनी गायकवाड शिंदे यांचा आपल्या आईबद्दल बोलताना कंठ दाटून आला , तशीच त्यांची नात ऋचा शिंदेलाही आपल्या आजीचे कौतुक करताना अश्रु अनावर झाले होते , कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . कार्यक्रमास आलेल्या सर्व पाहुण्यांनी , मित्र परिवार तसेच मान्यवरांनी जेवणाचा आस्वाद घेतला . यावेळी शारदा शंकर चौगुले ( मुख्याध्यापिका महात्मा विद्यामंदिर सोलापूर),सोनल केत वरिष्ठ लिपिक वेतन पथक जिल्हा परिषद सोलापूर, रावसाहेब भालेराव सेवानिवृत्त विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर , स्वप्नील चाबुकस्वार केंद्रप्रमुख मनपा मराठी शाळा क्रमांक ३० सोलापूर, विजयकुमार हुल्ले सेवानिवृत्त प्राचार्य नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल सोलापूर,रविशंकर कुंभार प्राचार्य नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल सोलापूर, संगप्पा कांबळे (मुख्य संपादक लोक तंत्र डिजिटल चॅनेल सोलापूर ), विनोद गायकवाड, गैबू जाधव , विजयकुमार गायकवाड , रजनीकांत इंगळे,अंबादास तुपसाखरे या प्रमुख मान्यवरांसह शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी वृंद, नातेवाईक तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा गुर्रम यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश गायकवाड आणि मिलिंद जाधव यांनी मानले.







