Nation
Trending

सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 टेबल यांच्यावतीने कंदलगाव येथील राऊंड टेबल जीवन ज्योत प्रशालेस  सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट 

 द. सोलापूर. दि.१२ , (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) कंदलगाव येथील राऊंड टेबल जीवन ज्योत प्रशालेत सोलापूर अचिव्हर्स राऊंड टेबल 187 टेबल यांच्यावतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवण्यात आले. प्रशालेकडून आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य  पी. एम. कमळे होते. 

प्रशालेतील मुलींना पिरियडच्या काळात होणारा त्रास, स्वच्छता व त्यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी म्हणून  सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवण्यात आले.  .  

 कार्यक्रम ज्यांच्या योगदानातून आणि प्रयत्नातून मशीन बसवण्यात आले. ते माझी SART 187 चे चेअरमन धनंजय गोडबोले यांच्या प्रयत्नातून सदर कार्यक्रम शक्य झाल्याचे प्राचार्य पी.एम कमळे म्हणाले . 

यावेळी प्राचार्य पी एम कमळे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून राऊंड टेबल 187 या टेबलचे सामाजिक कार्य शैक्षणिक योगदान याची माहिती देऊन त्यांचे कौतुक केले . 

                 याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉक्टर नवल शहा मॅडम यांनी मुलींनी घ्यावयाची काळजी व आरोग्याची स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी SART 187 चे सर्व महिला प्रतिनिधी  रुचिरा गोडबोले, राशी कार्वेकर, पायल सोनी , पल्लवी सोनी, वामिनी तापडिया, मनीषा डागा, जानवी केवलरमणी, सोनाली सोमानी, पूजा गुंडुक, शर्वरी कोठारी, व प्रियंका चिट्टे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका चिट्टे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी केले.

              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम  घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button