Nation
Trending

मंद्रुपचे अप्पर तहसिलदारपदी विष्णू बुटे यांनी पदभार स्वीकारला तर तहसीलदार सुजित नरहरे यांची हिंगोली येथे सहाय्यक मुंद्रांक जिल्हाअधिकारी म्हणून पदोन्नती


मंद्रूप प्रतिनिधी.राहुल उडणशिव

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील नूतन तहसिलदार म्हणून विष्णू नामदेव बुटे यांची नियुक्ती झाली असून मंद्रुपचे तहसीलदार सुजित नरहरे यांची हिंगोली येथे सहाय्यक मुंद्रांक जिल्हाअधिकारी म्हणून पदोन्नती झाली. त्यांच्या जागी गडहिंग्लजचे नायब तहसिलदार म्हणून विष्णू नामदेव बुटे यांची मंद्रुप तहसिलदार पदी नियुक्ती झाली. त्यांनी शुक्रवार दि २७ डिसेंबर २०२५ रोजी पदभार स्विकारला. तासगांव तालुक्यातील विसापूर येथील बुटे रहिवासी आहेत बुटे यांनी यापूर्वी सांगोला, माढा, मुदरगढ आणि गडहिंग्लज येथे नायब तहसिलदार म्हणून उत्कृष्ठपणे कामे केली. त्यामुळे त्यांना कोल्हापूर व पुणे विभागीय उत्कृष्ठ तहसिलदार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या कामाला पहिला प्राधान्य देऊन नागरिक व प्रशासन मध्ये सुसंवाद निर्माण करण्याचे काम करणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्याना कायदयाच्या चौकटीत राहून न्याय देण्याचे काम करू असे नूतन तहसिलदार विष्णू बुटे यांनी पत्रकारांशी पदभार घेतल्यानंतर बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button