Nation
Trending

सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये झळकले सुवर्ण यश : सायली विजय अष्टूळ प्रथम

मोहोळ दि. [ प्रतिनिधी ] : स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे नुकताच वार्षिक दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात सायली विजय अष्टूळ हिने सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतून प्रथम क्रमांकाने पदवी उत्तीर्ण होत सुवर्ण पदकाची मानकरी ठरून कॉलेजच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा ठसा उमटवला.
अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम आणि प्रबळ जिद्दीच्या बळावर सायलीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे केवळ महाविद्यालयाचाच नव्हे तर संपूर्ण परिसराचा गौरव वाढला आहे. दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते तिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिच्या यशाचे कौतुक केले.
सायलीच्या या यशामुळे तरुण विद्यार्थिनींसाठी ती एक प्रेरणास्थान ठरत असून, “मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा संगम यशाच्या शिखरावर पोहोचवतो,” हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल कुटुंबीय, प्राध्यापक वर्ग, मित्र – परिवार यांच्यावतीने अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button