Nation
Trending

"सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंती निमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन" स्पर्धाचे आयोजन

“सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंती निमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन

      केंद्र सरकार, नवी दिल्ली यांचे वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणुन साजरा केला जातो.

      मा.गृह मंत्रालय, केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंती निमित्त सर्व पोलीस ठाणेच्या स्तरावर रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

     त्या अनुषंगाने मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मा.श्री.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली मौजे अकोलेकाटी येथे 5 कि. मी. चे ” रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धाचे ” आयोजन करण्यात आले होते.

      दिनांक 31.10.2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या  ” रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा करीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले मा.श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे, श्री.सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी व अंमलदार असे एकूण 20 यांनी तसेच मौजे अकोलेकाटी येथील पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणा मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी व आसपासच्या अशा 200 लोकांनी सहभाग नोंदविला असून त्याबाबत बेवसाईटवर अपलोड केले आहे. सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थी यांना पोनि/मा.श्री.राहुल देशपांडे यांनी उज्वल भविष्या करीता मार्गदर्शन केले आहे. 

      मा.श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा मध्ये स्वत: सहभाग नोंदवुन 5 कि.मी.चे अंतर धावुन पुर्ण केले आहे. 

      आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा मध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थी मधुन प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक निवडुन त्यांना श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे व मा.श्री.सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक यांचे हस्ते बक्षीस परितोषक वितरण करण्यात आले आहे. तसेच सहभाग नोंदविलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदक देण्यात आले आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button