Nation

ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा.लि. युनिट ५ तडवळ कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ सांगता समारंभ संपन्न

अक्कलकोट. दिनांक २८, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव) ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा.लि. युनिट ५ तडवळ कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ सांगता समारंभ संपन्न झाला.गाळप हंगाम २०२५-२६ च्या सांगता समारंभाचा कार्यक्रम दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. मा. संचालक श्री. ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला.मा.चेअरमन श्री.बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाने या हंगामात कारखान्याने उल्लेखनीय कामगिरी करत ६.८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप, १०.८६% सरासरी उतारा, ४.४२ कोटी युनिट वीज निर्मिती व २.८० कोटी युनिट वीज निर्यात केली आहे.यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. व्हि.एम.गायकवाड व सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button