Nation
Trending

तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई — ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघडकीस

तुळजापूर, २ नोव्हेंबर २०२५ (प्रतिनिधी सुरज थोरात ): तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांनी माळुंबा येथून चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रॉली कर्नाटकातून जप्त करून दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातुन कुबोटा कंपनीचा ट्रकटर व ट्रॉली मिळून तब्ब्ल ८लाख ४०हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सपोनि. गोकुळ ठाकूर व पथकाणी केले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. १६ऑक्टॉबर रोजी पहाटे माळुंबा गावातील फिर्यादी श्री. वडणे याचा कुबोटा कंपनीच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीची काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती.त्याची तक्रार तमालवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान बार्शी शहर पोलीसांनी तेथील प्रकरणाच्या तपासादरम्यान संवशयित म्हणून वैभव ज्ञानेश्वर फंड (२९रा. सावरगाव ता. तुळजापूर )आणि संजय जगन्नाथ शिरगिरे (३१. रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर ) या दोघांना ताब्यात घेतले होते. यावेळी चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या ताब्यातून तब्बल सहा कुबोटा ट्रॅक्टर आणि एक मोटरसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यातील एक ट्रॅक्टर माळुब्रा येथून चोरीला गेलेला असल्याचे तामलवाडी पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले तामलवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी पाच ते सहा महिन्यापूर्वी उळे गावातून जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर चोरी करून कर्नाटकातील विजापूर भागात विकलेची कबुली दिली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि आरोपींच्या माहितीच्या आधारे चोरीतील ट्रॅक्टर व ट्रैली जप्त करण्यात यश मिळवले.या कारवाईत तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पो. उप. नि. प्रदीप टेकाळे, पो. अं जुबेर काझी, दिनकर तोगे, नरवडेगोपाळ सलगर,सुरज नरवडे, उमेश माने आदिचा सहभाग होता. ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईमुळे चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांकडून तामलवाडी पोलिसांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button