Nation
Trending

विमानतळ परिसरात ड्रोन उडविणाऱ्या दोन इसमांवर गुन्हा दाखल

सोलापूर ( प्रतिनिधी ) विमानतळ परिसरात ड्रोन उडविणाऱ्या दोन इसमांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर विमानतळ हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले असुन सोलापूर शहरात मा.पोलीस
आयुक्त सो. यांनी सोलापूर शहरात ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास मनाई
आदेश परीत केलेला आहे. दि.१३/१०/२०२५ रोजी सांयकाळी ०६.४५ वा.चे सुमारास विमानतळ
वॉच टॉवर नंबर ४ परीसरात कोणीतरी इसम बेकायदेशीरपणे हवेत ड्रोन उडवत असलेबाबतची
माहिती मिळालेवरून संबंधित परिसरात शोध घेतला असता, सदरचे ड्रोन हे जहागिरदार लॉन्स,
नागनाथ नगर, विमानतळाचे लगत पाठीमागे येथील कार्यक्रमामध्ये इसम नामे १.विशाल प्रकाश खरात
रा. ४८,राजीवजी नगर, आम्रपाली चौक,जुना विजापुर नाका,सोलापूर २. समद म. हनीफ शेख रा.१३९,
कुर्बान हुसेन,नगर गुरुनानक चौक,सोलापूर हे इसम ड्रोन उडवित असल्याचे आढळून आले. त्यावेळी
त्यांचेकडे ड्रोन उडविण्याच्या परवानगीबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे ड्रोन उडविण्याची
परवानगी नसल्याचे आढळून आल्याने नमुद इसमांवर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
करण्यात आलेला असुन त्यांचेकडील ड्रोन जप्त करण्यात आलेले आहे.
याद्वारे सोलापूर शहरातील नागरिकांना अवाहन करण्यात येते की, सोलापूर शहरात ड्रोन
किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र चालविण्यास मनाई असुन कोणीही विनापरवाना ड्रोन उडवू
नये. अन्यथा संबंधितांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button