Nation
Trending

शेळगी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

सोलापूर दि ४ (प्रतिनिधी अर्जुन बनसोडे)

शेळगी केंद्र शिक्षण परिषदेस गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक , शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद संपन्न झाली.यावेळी शिक्षण परिषदेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथील अधिव्याख्याता डॉ.प्रभाकर बुधाराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे हिप्परगे यांच्या वतीने परिपाठाचे सादरीकरण करून शिक्षण परिषदेस उत्साहात सुरुवात झाली. या शिक्षण परिषदेमध्ये एकूण पाच तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले यात केंद्रातील तंत्रस्नेही तज्ञ मार्गदर्शक म्हणून मुश्रीफ शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणे यांनी तंबाखू मुक्त शाळा आणि डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम यावर सविस्तर मार्गदर्शन केले, सकारात्मक शिस्त या विषयावर रेखा पाटील महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल सोलापूर यांनी उदाहरणासह सर्व शिक्षकांना सकारात्मक शिस्तीबद्दल सखोल माहिती दिली.दुर्गादेवी उरट यांनी पॅट चाचणी अंतर्गत विद्या समीक्षा यावर शिक्षकांनी स्विफ्ट चॅट ॲप कसा वापर करावा याबद्दल पीपीटी द्वारे सविस्तर मार्गदर्शन केलेनिपुण महाराष्ट्र अंतर्गत दिनांक १ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या निपुण संविधान जनजागृती या विषयावर विश्वभूषण विद्यालयाचे सहशिक्षक . सैपन लालबाग यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय विषयावर केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे यांनी यु-डायस प्लस ,सरल पोर्टल, विद्यार्थी सुरक्षा समिती, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची स्तर चाचणी, किशोरी मेळावा, २६ जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या कवायत, इत्यादी सर्व प्रशासकीय विषयांवर सविस्तर आढावा व मार्गदर्शन केले.या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन मंजुषा रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश पवार यांनी केले. ही शिक्षण परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, पर्यवेक्षक श्री नकाते , संतोषकुमार तारके आदी सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button