महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत दि कराड को-ऑप अर्बन बँकेचा २८ वा वर्धापनदिन साजरा


सोलापूर, दि ०५ , ( प्रतिनिधी ) : दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड, चाटी गल्ली, सोलापूर शाखेचा २८ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे तसेच सहाय्यक महाव्यवस्थापक सुरज शहा उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना नवीन कारचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते. याप्रसंगी बँकेचे खातेदार प्रकाश पाटील, विलास पाटील, विक्रांत वानकर, समर्थ वानकर, सुभाष पवार, अप्पा पवार, लक्ष्मण पवार, अर्जुन अर्शीद, सुनील घाटगे, दिलीप मोरे, यशवंत पाथरुटकर, विश्वास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व खातेदारांचे आभार मानले. दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि.ला १०९ वर्षे पूर्ण झाली असून बँकेने ७ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे.
सोलापूरमध्ये बँकेला २८ वर्षे पूर्ण झाली असून सोलापूर शाखेच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. शाखेने नुकताच १३० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाखा व्यवस्थापक विष्णू लामकाने व सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे आणि सहाय्यक महाव्यवस्थापक सुरज शाहा यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाखा व्यवस्थापक विष्णू लामकाने यांनी उपस्थित सर्व मान्यवर व खातेदारांचे आभार मानले.


