

मोहोळ दि. [ प्रतिनिधी सचिन गवळी ] : मोहोळ विधीज्ञ मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी ॲड. अमोल देशपांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक रामलिंग महामुनी व राजन घाडगे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बापूसाहेब माने हे उपस्थित होते. ॲड. अमोल देशपांडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्कारप्रसंगी बोलताना विधी स्वयंसेवकांनी ॲड. देशपांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. न्याय व्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असून अध्यक्षपदाच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील विधीज्ञ संघटना अधिक सक्षम व कार्यक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲड. अमोल देशपांडे यांनी सत्काराबद्दल आभार मानत, विधीज्ञ मंडळाच्या माध्यमातून वकिलांच्या हितासाठी तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.
या सत्कारामुळे मोहोळ विधीज्ञ मंडळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात विविध विधी विषयक उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



This design is steller! You certainly know how to keep a reader
entertained. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Great job.
I really enjoyed what you had to say, and more than that,
how you presented it. Too cool!