Nation
Trending

आगामी गणेशोत्सव डी.जे. व डॉल्बी मुक्त साजरा करा

शांतता कमिटी बैठकीत सोलापूर तालुका,पोलीस ठाण्याचे आवाहन

 सोलापूर दि ०४ सप्टेंबर ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क )  आगामी गणेशोत्सव काळात म्हणजेच दिनांक 14.09.2026 पासुन सुरू होणा-या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक यांनी दिनांक 04.09.2026 रोजी 12.00 वा.सुमारास सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील यांची शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले होते.

          आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकी मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना श्री.कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी गणेश उत्सवाच्या कालावधीत डी.जे. व डॉल्बीचा वापर करू नये, गणेश उत्सवाच्या कालावधीत प्रत्येक मंडळानी पारंपारिक वाद्य वाजवावेत, पर्यावरण पुरक गणेश मुर्ती वापरावेत, गणेश उत्सवाच्या दरम्यान जास्तीत जास्त समाज उपयोगी सामजिक उपक्रम राबवावेत, सर्वोत्कृष्ट गणेश मंडाळास तालुकास्तर ते विभागीय स्तरा पर्यंत बक्षीस वितरण करणार असून त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळ उत्कृष्ट राहतील या अनुषंगाने प्रयत्न करावेत, प्रत्येक गणेश मंडाळानी पोलीस ठाणे कडुन परवानगी द्यावी, गणेश मुर्तीच्या संरक्षणा करीता दोन कार्यकर्ते नियमित मंडपा मध्ये उपस्थित रहावे, गणेश मुर्तीचे विसर्जनाच्या दिवशी दिलेल्या वेळेत विसर्जन करावे वगैरे सूचना दिल्या आहेत.

       सदर शांतता कमिटीच्या बैठकी करीता कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते असे एकूण 100 ते 125 उपस्थित होते. सदर शांतता कमिटी बैठकीचे प्रस्तावना व आभार प्रदर्शन श्री.सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

      सदरची शांतता कमिटीची बैठक मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री.सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.कुंदन गावडे, पोनि/सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी आयोजित केली होती. सदर बैठकी करीता पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ कदम, श्री.प्रवीण जर्दे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता सुपे, सीमा डोंगरीतोट व पोलीस अंमलदार उपस्थित होते.      

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button