
ग्रामपंचायत अधिकारी अन् शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात

पंढरपूर, दि. १६ मार्च, ( द लोकतंत्र नेशन नेटवर्क )पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील एका ग्रामस्थांकडून घरकुल रकमेचा शेवटचा हप्ता देण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी व शिपाई यांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे.येथील तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले असून एक लाख वीस हजार रुपये मंजूर झाले होते. या मंजूर घरकुल रकमेचा शेवटचा हप्ता देण्यासाठी 13 मार्च रोजी पडताळणी कारवाई दरम्यान ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांनी स्वतःसाठी व ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत प्रकाश मुकरे यांच्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली . तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच घेतली. एवढी ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुक्रे हे हजर नसल्याने त्यांच्यावर 16 मार्च 2026 रोजी पडताळणी कारवाई करण्यात आली. पडताळणी कारवाईदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी परिषद नोकरी यांनी मंजूर घरकुल रकमेचा शेवटचा हप्ता देण्यासाठी तळजळीवरून 12,000 रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कम ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्या दरम्यान ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतः वीस रुपयांची लाच स्वीकारली.सदरची कारवाई श्री देशपांडे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक एसीबी पुणे, अजित पाटील अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी पुणे, प्रशांत चौगुले पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रविंद्र लांभाते पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर, श्री शैलेश पवार पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर, पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, स्वामीराव जाधव, अक्षय श्रीराम यांनी केली.



