Nation
Trending

नवसमता युवक क्रीडा मंडळ, डी. व्ही. फडतरे विचार मंचच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

सोलापूर, दिनांक १८ एप्रिल, (प्रतिनिधी सुधाकर कसबे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त नवसमता युवक क्रीडा मंडळ व आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी. व्ही. फडतरे विचार मंच, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व अक्षय ब्लड बँक यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. १७/०४/२०२६ गौतम नगर, बुद्ध विहार, विजापूर नाका, सोलापूर येथे केले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार मंडळाचे मार्गदर्शक आयु. आनंद फडतरे यांच्या हस्ते व डी. व्ही. फडतरे यांच्या प्रतिमेस सचिन कोलते व गौतम कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजोपयोगी कार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, नवसमता युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शिलरत्न सुरवसे, सचिव अजितकुमार साबळे, कार्याध्यक्ष राहुल साबळे, सहखजिनदार गिरीष उडानशिव, कीर्तीपाल घोडकुंबे, डी. व्ही. फडतरे विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष कपिल शंखे, सचिव इंद्रजित कांबळे, विशाल फडतरे आदीनी मेहनत घेतली.उदय साबळे, शशिकांत साबळे, मिलिंद फडतरे, प्रकाश गायगवळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button