Nation

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध;

आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा , दि ३० जुलै , ( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क ) मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2019, भारतीय दंड संहिता कलम 354, 504, 506 व 509 अन्वये दाखल गुन्ह्यात मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, मंगळवेढा, श्रीमती वृशाली (व्ही. के.) पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी शंकर उर्फ दादा बसवेश्वर बुरजे यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात दि. 14/03/2019 रोजी आरोपीने फिर्यादी महिलेचा विनयभंग करून तिचा शीलभंग होईल असे कृत्य केले तसेच शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व शीलाचा अपमान होईल असे शब्द उच्चारल्याबाबत दि. 15/03/2019 रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी करून आवश्यक पुरावे संकलित करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजादरम्यान मा. सहाय्यक सरकारी वकील श्री. स्वप्नील अभंग, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार व्ही. एम. वाघमारे (ब.क्र. 1703) तसेच कोर्ट ऑर्डरली पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. बाबर (ब.क्र. 1351) यांनी सरकारी पक्षाची प्रभावी बाजू मांडली.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा

भा.दं.वि. कलम 354 – 03 वर्षे सक्तमजुरी व ₹5,000/- दंड.

भा.दं.वि. कलम 504 – 06 महिने साधी कैद व ₹1,000/- दंड.

भा.दं.वि. कलम 506 – 06 महिने साधी कैद व ₹1,000/- दंड.

भा.दं.वि. कलम 509 – 01 वर्ष साधी कैद व ₹3,000/- दंड ,

 तसेच न्यायालयाने एकूण ₹10,000/- दंडापैकी ₹5,000/- फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे व उर्वरित ₹5,000/- राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले असून सर्व शिक्षा एकत्रित (Concurrent) भोगण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर गुन्हा सिद्ध होण्यासाठी माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय श्री विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बिरिगिड्डे, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, तसेच सरकारी वकील, पैरवी अधिकारी व कोर्ट ऑर्डरली यांच्या प्रभावी समन्वयामुळे हा गुन्हा यशस्वीरित्या सिद्ध झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button