Nation
Trending

बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यावर मंद्रूप पोलिसांची कारवाई

दारूसह कार, मोबाईल व रोख रक्कम असा ७ लाख ६३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मंद्रूप, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)बेकायदा दारू वाहतूक करून विक्रीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर मंद्रूप पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांची विदेशी दारू व बीअर, चारचाकी वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ६३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंद्रूप पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४२०/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) व ६५ (अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली. ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता १३ मैल ते टाकळी मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हा रात्री ११.३२ वाजता दाखल करण्यात आला.पोलिसांच्या माहितीनुसार, शेखर गुरबाळाप्पा बगले (वय ३५, रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर) हा आरोपी बेकायदा दारू विक्रीच्या उद्देशाने कारमधून दारू घेऊन जात असताना पोलिसांच्या ताब्यात सापडला.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल- ९,६०० रुपये किमतीच्या ट्युबर्ग कंपनीच्या ६५० मिली क्षमतेच्या सीलबंद बीअरच्या ४८ बाटल्या.- १०,००० रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मिली विदेशी दारूच्या ४० बाटल्या.- ९,२४० रुपये किमतीच्या इम्पीरियल ब्ल्यू कंपनीच्या १८० मिली विदेशी दारूच्या ४२ बाटल्या.- ३,८४० रुपये किमतीच्या किंगफिशर कंपनीच्या ५०० मिली क्षमतेच्या बीअरच्या २४ सीलबंद टिन.- ४,९४० रुपये किमतीच्या ब्लेंडर्स प्राईड कंपनीच्या १८० मिली विदेशी दारूच्या १३ बाटल्या.- ७ लाख रुपये किमतीची बलेनो कार क्रमांक MH 13 EK 4918.- २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन.- आरोपीच्या ताब्यातील १ हजार रुपये रोख रक्कम, ५०० रुपयांच्या दोन नोटा.अशा प्रकारे पोलिसांनी दारू, वाहन, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ६३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीने कोणताही पास किंवा परमिट नसताना दारू आपल्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) व ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई परिमंडळ पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गणेश जगन्नाथ पाटील (वय ३६) यांनी दिली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम GPSI चव्हाण यांनी केले असून, पुढील तपास HC २३ गुरव करीत आहेत.सविनय सादर — गणेश शिंदे, परिमंडळ पोलीस उपअधीक्षक, मंद्रूप पोलीस ठाणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button