
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारकवठे,(प्रतिनिधी राहुल उडाणशिव) दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंद्रूप पोलिसांनी कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य तसेच तीन दुचाकी असा एकूण ४ लाख ५६ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २.३३ वाजण्याच्या सुमारास भंडारकवठा, ता. दक्षिण सोलापूर येथे जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी मलकप्पा रामप्पा लोणी, अक्षय भुजंग गुजरे, संतोष शिवपा केंगार, चंद्रशेखर पिरगुंडा बिराजदार, सतीश आमसिद्ध जंगलगी, गजानन महादेव बिराजदार आणि निंबांना महादेव जंगलकी, सर्व रा. भंडारकवठा, ता. दक्षिण सोलापूर, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान विविध व्यक्तींच्या ताब्यातून रोख रक्कम व विवो कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल, तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे १५ हजार, १३ हजार, १५ हजार व १२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि विवो कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आल्याचे नोंदविण्यात आले आहे. तसेच गजानन महादेव बिराजदार यांच्याकडून १३ हजार रुपये आणि निंबांना महादेव जंगलकी यांच्याकडून ७ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.याशिवाय जुगार खेळत असलेल्या ठिकाणी १३ हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, तसेच ५२ पत्त्यांचा डाव आढळून आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.पोलिसांनी या कारवाईत एमएच १३ ईटी २७८३ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, एक इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि एमएच १३ एएफडी ६९२५ क्रमांकाची टीव्हीएस मोटरसायकल असा वाहनांचा मुद्देमालही जप्त केला आहे.या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाणे गु.र.नं. ४०१/२०२६ दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपींना अटक करण्यात आलेली नसून बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.या प्रकरणी पोशि/१२४३ ज्ञानेश्वर राम भोसले, वय ३५ वर्षे, नेमणूक मंद्रूप पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई जी. PSI राठोड यांनी केली असून, पुढील तपास PSI चव्हाण करीत आहेत.मा. श्री. गणेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक, मंद्रूप विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


