Nation
Trending

प्रवाश्यांच्या आरोग्याबाबत हयगय खपवून घेणार नाही - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सोलापूर दि.28, (प्रतिनिधी राहुल उडाणशिव)

प्रवाश्यांच्या आरोग्याबाबत हयगय खपवून घेणार नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सोलापूर एसटी आगारातील व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई सोलापूर (प्रतिनिधी) – राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान अस्वच्छता आणि दुर्गंधीचे प्रश्न कायम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बस आगार व्यवस्थापकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पाहणीदरम्यान सरनाईक यांनी प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. मागील भेटीत प्रवाशांकडून शौचालये आणि पाणपोईबाबत अनेक तक्रारी नोंदल्या गेल्या होत्या. त्यानंतर परिसर तातडीने स्वच्छ करण्याचे आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र यावेळीही बसस्थानक परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि देखभालीचा अभाव आढळल्याने मंत्री सरनाईक यांनी संताप व्यक्त केला.एसटी महामंडळामार्फत प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुटसुटीत सुविधा देणे अनिवार्य असल्याचे सांगत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बस आगार व्यवस्थापनातील त्रुटींवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित करत त्यांनी तातडीने स्वच्छता, दुरुस्ती आणि सुविधा सुधारणा उपक्रम राबवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.सरनाईक यांच्या या कारवाईनंतर सोलापूर बसस्थानकातील सेवा सुधारण्यासाठी पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button