Nation
Trending

मोहोळ येथील जि. प. प्राथ. शाळा नंबर 1 व 2 च्या प्रांगणात क्रिकेटच्या स्पर्धा उत्साहात संपन्न ...


मोहोळ , दि . १५ ( प्रतिनिधी सचिन गवळी ), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळ नंबर 1 व मोहोळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते , टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 व 2 च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मोहोळ नगरपरिषद चे दिनेश गायकवाड आणि सोलापूरचे डान्स मास्टर रवी सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शाळांना क्रिकेटचे साहित्य मोहोळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन कडून मोफत देण्यात आले.
प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांच्या संघात नेताजी प्राथमिक विद्यामंदिर चा मुलांचा संघ अंतिम विजेता ठरला. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळ नंबर 1चा मुलांचा संघ उपविजेता ठरला. तर उत्तेजनार्थ क्रमांक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळ नंबर 2 शाळेला गौरविण्यात आले..
तसेच प्राथमिक स्तरावरील मुलींच्या क्रिकेट संघांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळ नंबर 1 चा संघ अंतिम विजेता ठरला आणि नेताजी प्राथमिक विद्यामंदिर चा मुलींचा संघ उपविजेता ठरला. तर उत्तेजनार्थ क्रमांक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समर्थ नगर शाळेला गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्रिकेट खेळल्याबद्दल प्रतीक पुराणिक, आरोही खंदारे ,आयुष काकडे ,संकल्प गायकवाड , कुंज काकडे , अरसलान कुरेशी,राम बाबर, हृदया कौलगे, सोहम माळी यांना ट्रॉफी देऊन गौरवले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रिकेट असोसिएशनचे सचिव मन्सूर इनामदार आणि शाळा नंबर एक चे उपक्रमशील शिक्षक सत्यवान खंदारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षकवृंद ज्ञानेश्वर सोनटक्के , महादेव गवळी, शर्मिला साबळे, नेताजी प्राथमिक विद्यामंदिर चे आदलिंगे सर लोंढे सर ,कदम मॅडम यांनी सहकार्य केले. तसेच शाळेचे पालक सतीश गायकवाड ,राहुल ओहोळ, राजकुमार माने, अंबादास गुंड ,संजय खंदारे, रविकिरण स्वामी, भारत पुराणिक इत्यादी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button