Nation
Trending

मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्षपदी नसीर मोमीन तर उपाध्यक्षपदी सोमनाथ मुसांडे यांची निवड

मोहोळ दि ११ , (तालुका प्रतिनिधी सचिन गवळी ) मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी मातोश्री मीनाताई ठाकरे बालोद्यान या ठिकाणी आयोजित बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला, या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली.
मोहोळ तालुका अध्यक्षपदी नसीर मोमीन यांना गतवर्षीत चांगले काम केल्यामुळे मुदतवाढ देऊन २०२६ सालासाठी ही अध्यक्षपदी नसीर मोमीन यांची निवड समितीच्या बैठकीत निवड करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षपदी निर्भीड आपली जनता या वर्तमानपत्राचे संपादक सोमनाथ मुसाडे यांची तर सचिव पदी दैनिक लोकमतचे नरखेड विभागाचे प्रतिनिधी हनुमान पवार यांची आणि खजिनदारपदी दैनिक मोहोळ वार्ता चे संपादक राजू साखरे, तसेच तालुका कार्याध्यक्षपदी दैनिक बंधुप्रेम चे तालुका प्रतिनिधी रफिक(भाई )शेख यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
या निवडीसाठी आयोजित बैठकीमध्ये सर्वानुमते बहुमताने वरील कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
ही घोषणा कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

यावेळी जेष्ठ पत्रकार व पत्रकार संघाचे मार्गदर्शक श्रीधर उन्हाळे सर, कैलास रणदिवे सर, परमेश्वर अवताडे सर,रमजान तांबोळी, योगेश शिंदे सर,ज्येष्ठ पत्रकार अश्फाक बागवान सर, राजगोपाल खांडेकर सर सुशील वाघमारे , आदी मान्यवरांनी नूतन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी नूतन अध्यक्ष नसीर मोमीन म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत आहे आणि आपण लवकरच पत्रकारांची मोहोळ तालुक्यामध्ये कार्यशाळा घेण्याचे नियोजन असल्याचे मत नूतन अध्यक्ष नसीर मोमीन यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button