Nation

२८ रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा होणार गुणगौरव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनी कार्यक्रमाचे आयोजन

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गुणगौरव पुरस्कार सोहळा २८ जून रोजी

सोलापूर, दि २६ जून ( लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी नेटवर्क ) : निर्भीड, निष्पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारितेची चार वर्षे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा “गुणगौरव पुरस्कार सोहळा – २०२६” आयोजित करण्यात आला आहे.
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २८ जून २०२६, दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह (एसी हॉल), पहिला मजला, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, आरोग्य, उद्योग, महिला सक्षमीकरण, युवा नेतृत्व, कृषी, कला, सांस्कृतिक आणि सार्वजनिक सेवेसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून त्यांच्यापासून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कार सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, हितचिंतक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button