Nation
Trending

सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्यावतीने राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन

तुळजापूर दि.७,(धारशिव जिल्हा प्रतिनिधी सूरज थोरात )
तुळजापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तुळजापूर तालुक्याच्या वतीने तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेधाच्या अनुषंगाने तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष आनंद पंडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, जिल्हा सहसचिव तानाजी कदम, तालुका कार्याध्यक्ष विनोद धांडे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष धम्मशील कदम, योगेश घोडके यांच्यासह आरपीआयचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत म्हटले की, “न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. अशा कृत्यांचा कठोर निषेध करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.”

या निषेधादरम्यान कार्यकर्त्यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. निवेदन देताना प्रशासन परिसरात घोषणा देऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

📸 फोटो कॅप्शन:
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तुळजापूर तहसीलदारांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button